sachin tendulkar
sachin tendulkar
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आगामी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पायाच्या तळव्याला झालेल्या दुखापतीमुळे सचिननं इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतून माघार घेतली होती. सचिनची ही दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही.
आयपीएल सीझन फोरमध्ये सचिनच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळेच मुंबई इंडियन्सनी फायनलपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सचिन लवकरात लवकर फिट व्हावा अशी त्याच्या टीमची इच्छा असेल. तर मुंबई इंडियन्सचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू असलेला हरभजनसिंग मात्र चॅम्पियन्स लीगच्या संपूर्ण मोसमासाठी टीमसोबत असेल. भज्जीनं पोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर माघार घेतली होती. तर आणखी एक दुखापतग्रस्त मुंबईकर खेळाडू रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबतही टीम आशादायी आहे. मुंबई इंडियन्स बंगलोरमधील आपला ट्रेनिंग कँप संपवून सराव सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाली.