महेंद्रसिंह धोनी, कर्णधार
महेंद्रसिंह धोनी, कर्णधार
इंग्लंडनं टीम इंडियावर पुन्हा एकदा बाजी मारली. पहिल्यांदा कसोटी, नंतर ट्वेण्टी ट्वेण्टी आणि आता एकदिवसीय मालिका. कार्डिफ वन डे खिशात घालत इंग्लंडनं एकदिवसीय मालिकेतही टीम इंडियाला व्हाईटवॉश दिलाय.

इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा एक-एक खेळाडू दुखापतीचा सामना करत होता. टीम इंडियाचा कॅप्टन धोनीशिवाय सर्वांनाच दुखापतीमुळे काही काळ का असेना मैदानाबाहेर रहावं लागलं होतं.  दुखापतींची सुरूवात झाली ती जहीरखानपासून.
इंग्लंड विरोधातल्या पहिल्या कसोटी सामन्यात जहिरच्या पायाच्या स्नायू ताणला गेला. त्यात सुधारणा झालीच नाही पण तिसऱ्या कसोटी आधी टीम व्यवस्थापनान त्याला ऑपरेशनचा करण्यास सांगितलं.

जहीर खान
दुखापतींची मालिका सुरू झाली ती जहीर खानपासून, जहीरच्या पायाचा स्नायू ताणला गेल्याने, तिसऱ्या कसोटी आधीचं त्याला मैदानाच्या बाहेर रहावं लागंल.
हरभजन सिंह
हरभजन सिंहला दुखापत होण्याआधीदोन कसोटी सामन्यात हरभजनसिंहच्या खेळावर सर्वांनी संताप व्यक्त केला होता. यामुळेच की काय हरभजनला दुखापत झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. अखेर हरभजनचं पोट दुखत असल्याचं नॉटींगहॅमच्या कसोटी सामन्यात हरभजनने सांगून टाकलं. त्यामुळे हरभजनही दौऱ्याच्या बाहेर गेला

युवराज सिंह
युवराज सिंह याच्या बोटालाही दुखापत ट्रेन्टब्रिजमध्ये दुखापत झाली. युवराजचं अर्धशतक होत असतांना ब्रिसननचा चेंडू युवराजला लागला होता. त्याला चार आठवड्यांसाठी आराम देण्यात आला.

ईशांत शर्मा
ईशांत शर्माच्या डाव्या घोटाला जखम झाल्यानं त्याला ऑपरेशन करणे गरजेचं झालं.

वीरेन्द्र सहवाग
वीरेन्द्र सहवागच्या खांद्याचं दुखणं बरं झालं नव्हतं तरीही तो इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड दौऱयावर जाण्याआधी त्याला ऐकण्याचाही त्रास होत होता. दरम्यान इंग्लंडमध्ये त्याच्या खांद्याचं दुखणं बळावलं.

गौतम गंभीर
ओव्हल टेस्टमध्ये कॅच घेतांना गौतम गंभीरच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि त्यानंतर त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पुढच्या सामन्यात न खेळताच दौऱ्यावरून घरी परतला.

रोहित शर्मा
बॅटींग करतांना रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर तोही मायदेशी परतला.

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरच्या अंगठ्याला वनडे सामन्याआधी दुखापत झाली, त्यामुळे त्याला तीन आठवडे आराम देण्यात आला.

प्रवीण कुमार
प्रवीण कुमारला झालेली दुखापत मोठी नसली तरी सरावादरम्यान फुटबॉल खेळतांना त्याचा पाय मुरगळला.

मुनाफ पटेल
सुत्रांच्या माहितीनुसार मुनाफच्या पाय फ्रॅक्चर झाला, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तो भारतात परतला, यातही टीम इंडियाचा कॅप्टन धोनीने सर्वच सामन्यात चांगला खेळ केला, त्याच्या हाताला आणि पायाच्या घोटाला दुखापत झाली असली तरीही.